श्री. विजय रू. मेटकर

विशेष
साधी राहाणी व उच्च विचारसरणी अत्यंत मनमिळावू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तीमत्व संस्कारक्षम पिढीसाठी कटाक्ष

जन्म आणि मृत्यू

जन्म: २१ सप्टेंबर १९४१
मृत्यू दिनांक २३ एप्रिल २०१४, अमरावती.

विजय मेटकर

लेखकाबद्दल ...

नुकत्याच वैभव "गत" झालेल्या एका शेतकरी कुटुंबात जन्म. बालपणी वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे जबाबदारीने काम करून शिक्षण घेतले. सर्वांना कठीण वाटणारा Applied Mathematics हा विषय त्यांनी त्या काळात निवडला व पासही झाले !

'Virtue Clan' तयार करण्यासाठी तरूणपणी हजारो खेडयांतील लोकांशी संपर्क साधला.

New English High School, Mahal, Nagpur येथे Mathematics व Physics चे Teacher राहिलेत. Mathematics मध्ये M.Sc. करताना कौटुंबिक जबाबदारीमुळे ते पूर्ण न करता आल्याचे वैषम्य. अनेक सामाजिक संघटनांशी संबंध, राष्ट्रसेवादलाचे बौध्दिक विभाग प्रमुख पदही (नागपूर) त्यांनी भूषविले.

अत्यंत मनमिळावू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व. रोज सकाळी ते व त्यांचे Harmonium, शास्त्रीय रागदारी याची practice करीत. सतत १२५ दिवस नागपूर माध्यमिक बोर्डा समोर विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी उपोषण केले.

मुलांवरही संस्कार झालेच पाहिजे यावर कटाक्ष. इतके की दररोज संध्याकाळी एकत्र जेवणे व त्यातून ज्ञानवर्धन करणेही सुरू, जसे उदा. सूर्याची प्रत्येकी १० मराठी/हिन्दी नावे सांगा. Hardwork, मेहनतीचे पुरस्कर्ते, भ्रष्टाचाराच्या अत्यंत विरोधात. साधी राहाणी व उच्च विचारसरणी, हे तत्व स्वत:ही अंगिकारले व आपल्या भोवतीच्या लोकांवरही बिंबविले.

लेखकाचे दोन शब्द ...

"ज्ञानात प्रचंड शक्ती आहे (Knowledge is power), जाणणे म्हणजे जिंकणे (To know is to win), ज्ञानबोध क्रांती घडवितो (Enlightenment causes revolt) गॅलिलिओची-पृथ्वी गोल आहे व सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आईनस्टाईनची द्रव्य व उर्जा वेगळी नसून एकत्र आहे.अशा शोधांनी जगात प्रचंड क्रांती घडविली. विज्ञानाने जगाला पुढे नेले व निराशावाद झुगारून दिला.

पण आता विज्ञानच मानवजातीवर जुलूम करायला निघाले आहे. Atombombs, Nuclear weapons, प्रदुषणे, जंतु, रसायने (Chemical) अशी शस्त्रास्त्रे, सोबतच false claims, scandals यातून मानवजातीत निराशावाद येण्याची पार्श्वभूमी तयार झाली आहे. स्वातंत्र्य व हक्क, कर्तव्य व जबाबदारी या गोष्टींना मूलत: समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक वर्तमानाचा जागतिक भूतकाळाशी मार्गदर्शनात्मक संवाद होवून वर्तमानातील समस्यांची उकल व भविष्याची आखणी सेापी होवू शकेल..... मरणासन्न अवस्थेतही शेवटी deathbed वर (भिष्माप्रमाणे) थोर विचारवंत लेखक हेच बोलत होते.

हे पुस्तक आपल्या सारख्या सामान्य माणसांना वारंवार पडणार्‍या अनेक प्रश्नांची उकल व्यासमूनी व जनमेजयराजा यांच्या प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. It is the encyclopedia of questions you always wanted to know. त्यासाठी मानवाच्या कृषी शोधापूर्वी व नंतरचा इतिहास व त्यानंतर आजपासून जवळपास ३५०० वर्षांपूर्वी आपल्याला समजणारा, देव व असूर (सुर व असूर) यांच्या तत्वज्ञानात्मक संग्रामाचा, एक स्पष्टीकरणात्मक भाग आहे. याद्वारे ईश्वर, धर्म, संस्कृती यांना गणितात्मक, तत्वज्ञानात्मक बैठक देवून, उत्खनन शास्त्राच्या आधारे, पुन्हा नवीन वाद होवू नये, उलट असलेले ते वाद मिटावे यासाठी लेखक श्री विजय मेटकर आर्जव (urge) करतात ".