सुरासुर संग्राम

क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स

पुस्तकाबद्दल ...

एक संशोधकीय पुस्तक ज्यामध्ये भारतीय इतिहास, जगातील महत्वाची स्थळे, त्यांच्या नावांमधली समानता आणि इतर भौगोलिक स्मारके, आतापर्यंतची समज इत्यादी गोष्टींची वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे सत्यता मांडली आहे.

हे पुस्तक सुरासुर संग्राम ह्या शृंखलेतील पहिले पुस्तक आहे. क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स या अंकात एकूण ३४ प्रकरणे आहेत, त्या मध्ये द्रविड धर्म आणि आर्य धर्म , भाषांची समानता, जगातील भौगोलिक स्थळे, रावणाच्या लंकेचे खरे स्थळ, उत्खननांत मिळालेली महत्वाची कालदर्शक माहिती, पुराण, देवासुर संग्रामाचे सत्य इत्यादी बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या मनामध्ये दीर्घ काळापासून असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाद्वारे मिळू शकतात. एकूणच सत्यता व ज्ञानाची उंची वाढविण्या करिता हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

लेखक : श्री. विजय मेटकर
संपादक : डॉ. अनुभूती पाटील