डॉ. अनुभूती मेटकर पाटील

डॉ. अनुभूती मेटकर पाटील

संपादकीय मनोगत -

चीनमध्ये 3000 वर्षापुर्वीचे भगवान शंकराचे थडगे (समाधी) आहे. हे 2-3 वर्षापूर्वी एका मराठी वृत्तपत्रात वाचण्यात आले होते. चीन मध्ये आणि भगवान शंकर ? छे.... काहीतरी!..... मग मला कैलास मानसरोवर आठवायला लागले..... अरे हो, तोच भूभाग !

मुंबईच्या सायन (SION) ला मराठीत शीव म्हणतात. China चे ही नाव भगवान शंकरावरून पडले असावे असे वाटते. China India pact न म्हणता Sino - Indian pact म्हणतात ना! म्हणजेच भगवान शिव एका देशापुरते, एका धर्मापुरते नव्हते, हे मला पटायला लागले. भगवान शिवाची पुजा 5 धर्मांत करतात. हिन्दुधर्म (जगजाहीर शिवपुजा), जैनधर्म (तिर्थंकर), बौध्दधर्म, Ayyavazi व Bon - faith.

मग अजून वृत्तपत्रांमधेच वाचण्यात आले, तुर्कस्तानात भगवान विष्णुचे मंदीर आहे म्हणून, चाटच पडले : भगवान विष्णु आणि तुर्कस्तान? अॅनातोलीया नावाने (तुर्कस्तान) हे मंदीर आहे, आणि मग मी हया विषयाकडे कुतुहलाने व तेवढेच गांभीर्याने पाहायला लागले. म्हणजे भगवान महम्मद पैगंबर साहेबांच्या आधी, (कदाचित तुर्कस्तान तेव्हा नामकरण नसेलच, काही वेगळेच असेल), जगावर राज्य करणारे भगवान अथवा देव व राजे हे वेगवेगळया नावाने, वेगवेगळया भागात ओळखले जात होते. (गंगेचे विनाकारण गँजेस झाले तसे).

हया गोष्टी अजून उत्कंठा वाढवितच गेल्या. Soloman युरोपमध्ये, मध्य एशियात सुलेमान झाले व भारतात धर्म व नावासकट रूपांतरीत सलमान झाले. Abraham (एब्रााहम) ख्रिश्चन धर्मातून अजुन इब्रााहीम नावाने मुस्लीम धर्मात व अबराम / अभिराम नावाने हिंदू धर्मात.. Adam - अॅडम चे आदमसा किंवा आदमखॉ, शब्द जवळपास एकच शब्द अर्थ, धर्म बघा वेगळे ! Better (English) म्हणतांना बेहतर है (उर्दू) जुळायला लागले.

माझ्या इंग्रजी फोनेटीक्स ने Chaos ला चाओस म्हणावे वाटले, पण प्रत्यक्षात तर ते केऑस हते. मग Pharaoh (Ancient Egyptian and Greek Mythology) पुस्तकांमधल्या व्यक्तीचे नाव भैरवा उच्चारायचे आहे कळले. अन् भैरव... भैरवनाथ, ....egypt, .... Nile river, Babylon संस्कृती.... मनुष्य वसाहतींचा उगम, कृतींचा उगम, God Ram and city Roma (Rome, Rohm), Ron and Rawan उच्चारणात, अख्या मनुष्यजातीचा म्हणा, मनुष्यवंशाचा इतिहास....संस्कृती..... स्थलांतर.... शारीरिक genetic transfers आणि Mutations आपल्याला इथपर्यंत आजमध्ये घेऊन आलेत, हे स्वप्नवत वाटायले लागले व वैज्ञानिक दृष्टिकोणातून तो काळ, तो समाज व आजचे वैज्ञानिक युगातील विचार याचा एक तरल समन्वय असू शकतो, हे माझ्या सारख्या सर्वांना, ज्यांनी हया विषयावर विचार करून पाहिला, त्यांना उमगायला लागले.

का बरे? एक संस्कृती आहे ज्यात स्त्रियांना नशशिखान्त बुरखा घालायला लागतो की खरेच त्यातून तीचे नखही शोधणार्‍याला शोधावेच लागेल आणि एक दुसरी संस्कृती ज्यात अंगावर (पूर्ण) कपडे शोधायला लागतात. दोन्हीही संस्कृती आपापल्या समाजमान्यच आहेत.

M.B.B.S. MD करतांना बाबांच्या हया विषयावरच्या संशोधनाला मी काही हात भार लावू शकले नाही. पण जेथे मोठ्या शहरांमधे गेले, तिथली Library चाळून Human Anthrapology, Indian Mythology, Egyptian, Sumerian, greek and roman mythology, Ancient atlas, Ancient trade, ancient civilizations इ. विषयांवरची पुस्तके संदर्भ म्हणून बाबासाठी गोळा करताना, हळुहळू 'श्री विजय मेटकर' यांनी जवळपास 40 वर्षे ज्या व विषयाचा ध्यास घेतला होता, तो विषय मलाही 'सिरीयस' वाटायला लागला.

मी काही गांधी नाही, मदरटेरेसा नाही, अब्रााहम लिंकन वा नेल्सन मंडेला नाही, पण मी मानवी विचारांना युद्धात न ओढण्याच्या विचारांची आहे. लेखकाच्या हया पुस्तकाने जर जागतिक शांततेचा (हम सब एक है) हा जरी संदेश पोहोचविला, तरी मी समजेल की मानवाचे पृथ्वीतलावरचे अस्तित्व अजून काही काळ (कायम?) राहायला मदतच होईल.

आजच्या विज्ञान युगातले 2 + 2 = 4 हे गणित, व प्रत्यक्ष जगण्यातले अॅडजस्टमेन्टचे 2 + 2 may become 3 or even 5, when you socialise हे सत्य स्विकारावे लागते. कारण straight line straight line आहे पण विचारांना अंशांने विचार करावा लागतो.

गेल्या 40 वर्षातील हया Research ला लेखकाने Small pamphlets च्या स्वरूपात 15-20 वर्षापूर्वी (व्हर्चु प्रचार यंत्रणा), हळुहळु लोकांमध्ये वाटायला सुरूवात केली होती व त्यावरील परिक्षणे, निरीक्षणेही नोंदवणे सुरू केले होते. बरेच लोक Personally येवून भेटलेत. लेखकाशी Discussion करून, स्तंभित, अचंबित होवून 'अरे! असे असू शकते तर ....' असे समजून वारंवार येत राहिलेत. Some left with awe, wanting to go themselves into the depth of the subject आणि लेखक perfection च्या मागे लागलेत, प्रत्येक Statement चे प्रुफ देत राहीलेत. अगदी आजार पणावरही मात करून Proof correction करीत राहीलेत. त्यांच्या हया अथक परिश्रमांना साहित्यीक नव्हे, थोडे वैज्ञानिक व थोडे गणितीय भाषेत मांडताना, पुस्तक स्वरूपात देताना, त्यांच्या या परिश्रमांची, , Internal व Physical (आजारपण) Turmoil ची मी साक्षीदार आहे, याचा मला अभिमान वाटतो. देव त्यांना उदंड आयुष्य देवो अशी प्रभुचरणी प्रार्थना करून आज एक नव्या विचारवाटेला चला आपण सर्वजण सुरूवात करू या.

दिनांक 15/08/2014 :

आज लेखक आपल्यात नाहीत, पण त्यांची फार पुर्वीपासून इच्छा होती की हे अखंड 40 वर्षांचे संशोधन ज्यात तत्वज्ञान आहे, उत्खनने आहेत, देवांचा व असुरांचा, धार्मिक व ऐतिहासिक पात्रांचा उल्लेख आहे ते मराठीतून प्रकाशित व्हावे. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला प्राचीन भाषेचा दर्जा देण्याविषयी पुढे टाकलेले पाउल, सेतुसमुद्रम व सरस्वती नदी विषयांचा वर्तमानपत्रांतून येणारा उल्लेख, आज जगाला सत्याच्या जगात घेऊन जाण्यासाठीचे एक नवे पाऊल आहे. 'सत्य की व्याख्या ही साहित्य की निष्ठा है।' अलेक्झांड्रीया येथील टालेमीच्या (Ptolemy) प्रसिध्द ग्रंथालयाने, युनानच्या म्हणजे ग्रीकांच्या अंधविश्वासाला प्रथम तत्वज्ञान व नंतर विज्ञानाच्या मजबूत सिध्दांताने पूर्णत: काबू करून, जीवन जगण्याला एक नवी दृष्टी दिली, जी सैद्धानिक व वैचारीक होती (आचार्यचतुरसेन)

Out of extensive archaelogical sites in India, less than one percent have actually been excavated (Hidden Horizons - अक्षरपीठ अक्षरधाम), नुकतेच युक्रेनची राजधानी किंव (Kiev) जवळ भगवान विष्णूची पुरातन मूर्ती व मंदिर उत्खनात सापडले आहे. (archaelogical update website), चिकीत्सेचा हेतू एकाच एक संगती लावणे व सत्याचा शोध घेणे होय. (दाजी पणशीकर). माझ्याही दृष्टीने चिकीत्सा हेच विज्ञान आहे.
कुणी म्हणते (कदाचित बरेचजण म्हणतात) की History needs to be rewritten. हे बुक म्हणजे 'Encyclopedia of the questions you always wanted to know'. बघूया. हया पुस्तकाचा कणमात्र जरी यादृष्टीने उपयोग झाला तरी, लेखकाला चीर- समाधान मिळेल......