CHAPTER 2 :
द्रविड धर्म आणि आर्य धर्म
द्रविड सोबत आर्य, या दोन शब्दांनी,अत्यंत चुकीचा अर्थ सांगितला गेल्याने, भूतकाळात जगात अतिशय रक्तपाती कलह माजवल्या गेले. आर्य म्हणजे गोरे,उंच निळ्या डोळ्यांचे, आर्य ही भाषा आहे किंवा आर्य म्हणजे सुसंस्कृत किंवा आर्य म्हणजे भूमी मालक, जमीन-दार इत्यादि... तसेच द्रविड म्हणजे काळे, बुटके, दक्षिण भारतीय, चार प्रांतातील कुरूप, राक्षसासारखे अवाढव्य,धिप्पाड लाेक इत्यादि...