CHAPTER 3 :
सत्य कसे सापडले,समजले
सर आर्थर इव्हांन्स ह्यांचे नावही एेकण्या - वाचण्या पूर्वीच (१९८०) ह्या लेखकाने, ह्या पुस्तकातील संशोधनाला सुरुवात केली. जसा त्यांचा कश्यप मुनी केव्हा तरी झाला असलाच पाहिजे, त्याचा कुठेतरी राजवाडाही असलाच पाहिजे ह्यावर दृढ विश्वास होता, तसाच ह्या लेखकाचाही विश्वास होता की सुमारे १०० ते १२५ कोटी लोकांना प्रभावित करणारा हिंदू धर्मही काल्पनिक असूच शकत नाही. जसे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध, ख्रिश्चन धर्माचे देवपुत्र भगवान येशू ख्रिस्त, इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब आहेत, ....