CHAPTER 5 :
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या चूक मते, मिमांसांची दुरुस्ती : तसे नाही, असे आहे...
खाली दिलेली चुक मते, मिमांसा आजही, 2014 साली - प्रादेशिक,राष्ट्रीय भाषांमधील लिखीत वांग्मय तर आढळतातच पण इंग्रजी सारख्या जगभर प्रसारित होणार्या भाषेतील ज्ञानकोषातही सापडतात. ही मते, मिमांसा जगभर ज्यांच्याविषयी आदर आहे, ज्यांच्या अभ्यासाचा गहन संशोधन, चिंतनाचा दरारा आहे, अशा व्यक्तिंची आहेत. त्या व्यक्तींविषयीचा आदर कमी होऊ नये किंवा उगीच कलह निर्माण होऊ नये म्हणून त्या व्यक्तींची आणि त्या साहित्यांची नावे दिली नाहीत, कारण एक तर ती विधाने बर्याच पूर्व काळातील आहेत. तसेच ती विधाने करणार्या मूळ व्यक्ती आज हयात नाहीत.